जंगलात बहरलेले काटेसावरीचे झाड
जंगलात बहरलेले काटेसावरीचे झाड 
ॲग्रो गाईड

Indian Silk Tree : काटेसावर - पचन संस्था, कांजिण्यावर उपयोगी

अश्विनी चोथे
  • स्थानिक नाव    :     काटेसावर, सांवरी, सांवर       
  • शास्त्रीय नाव    :    Bomax ceiba L.       
  • इंग्रजी नाव     :     Indian Silk tree, Silk  Cotton Tree, Kapok Tree, Indian Bombax, Red Silk Cotton Tree, Red Cotton             Tree, Semul       
  • संस्कृत नाव     :     शाल्मली       
  • कुळ    :     Bombacaeae       
  • उपयोगी भाग    :     कोवळे दोडे (शेंगा), फुले, बिया
  • उपलब्धीचा काळ    :     फुले : फेब्रुवारी- मार्च, कोवळे दोडे (शेंगा): मार्च-एप्रिल,         
  • झाडाचा प्रकार    : काटेरी झाड        
  • अभिवृद्धी     : बिया        
  • वापर    : फुलांची, कोवळ्या शेंगची भाजी,  बिया भाजून तसेच कच्च्या खातात.
  • आढळ

  • काटेरी वृक्ष पूर्ण भारतभर सगळ्याच जंगलात वाढलेले आढळतो. याचे पानझडी वृक्ष जंगल, डोंगरकपारी, रस्त्याच्या कडेला तसेच शेताच्या बांधावर उंच वाढलेले दिसतात.
  • डिसेंबर महिन्यापर्यंत सावरीची सगळी पाने गळून जातात. जानेवारीत अनेक कळ्या पानेविरहित फांदीवर दिसतात. फेब्रुवारी ते मार्च पर्यंत सर्व झाड लाल गुलाबी फुलांनी बहरून जाते.       
  • वनस्पतीची ओळख
  • काटेसावरीची झाडे ३० ते ४५ मीटरपर्यत उंच वाढतात. हे झाड खोडापासून टोकापर्यंत त्रिकोणी काट्यांनी लगडलेले असते.
  • साल करड्या रंगाचे व खूप जाड असते. पाने संयुक्त, एका आड एक येणारी ५ ते ७ पर्णिका, अनेक शिरायुक्त व पानाच्या काठालाही शिरांच्या कडा असतात. पर्णिका १० ते २० सें.मी. लांब व ३ ते ६ सें.मी. रुंद असतात.
  • काटेसावरीची फुले मोठी, द्विलिंगी गडद गुलाबी तसेच फिक्कट गुलाबी रंगाची पाच पाकळ्यायुक्त असतात.
  • पाकळ्या जाड व पुंकेसर असलेले फूल असते. फुलांमध्ये मध असल्यामुळे अनेक पक्षी फुलांमधून मध भक्षण करतात. पाकळ्या आतून चमकणाऱ्या तर बाहेरून मऊशार आणि ५ ते ८ सें.मी. लांब व ३.५ ते ५ सें.मी. रुंद असतात. फळे तयार होताना पुंकेसर व पाकळ्यांचा भाग गळून पडतो.
  • शेंगा ८ ते १० सें.मी. लांब व ३ सें.मी. रुंद असतात. शेंगामध्ये अनेक बिया काळ्या रंगाच्या ३ मी.मी. असतात. पूर्ण पक्व झालेल्या शेंगामध्ये बिया पांढऱ्या कापसामध्ये लगडलेल्या. साधारण मिरीच्या दाण्यासारखा त्यांचा आकार व रंग असतो.
  • पाककृती फुलांची भाजी साहित्य : ३-४ वाट्या काटेसावरीची फुले, १ बारीक चिरलेला कांदा, १-२ बारीक चिरलेली मिरची, ४-५ ठेचलेल्या लसूण पाकळ्या, १ चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, फोडणीसाठी जिरे, मोहरी, आणि चिमूटभर हिंग, तेल मीठ चवीप्रमाणे. कृती :  प्रथम सावरीच्या फुलांच्या पाकळ्या काढून त्यातील पुंकेसर आणि स्त्रीकेसरचा भाग काढून घ्यावा. पाकळ्या स्वच्छ धुवून कढईत तेल टाकून जिरे, मोहरी आणि हिंगची फोडणी करून घ्यावी. त्यात कांदा, हिरव्या मिरच्या, लसूण लालसर परतून, हळद व लाल मिरची टाकून नंतर पाकळ्या टाकून चांगले परतून घ्यावा. चवीप्रमाणे मीठ मिसळावे.

    कोवळ्या दोड्याची भरलेली भाजी साहित्य : ५-६ काटेसावरीचे दोडे , १ बारीक चिरलेला  कांदा, १ ते २ चमचे आल लसूण मिरची पेस्ट, २-३ चमचे शेंगदाणा कूट, ४-५ चमचे बेसन, १ चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमच हळद, १ चमचा धने पूड, फोडणीसाठी जिरे, मोहरी, आणि चिमूटभर हिंग, तेल मीठ चवीप्रमाणे, कोथिबीर आवडीप्रमाणे.    कृती : प्रथम सावरीच्या दोड्यांना उभे काप करून आतील गर काढून टाकावा. वरील सर्व जिन्नस एकत्र कालवून ते मिश्रण त्या दाेड्यामध्ये भरून घ्यावे. नंतर कढईत तेल गरम करून जिरे, मोहरीची फोडणी देवून हे दोडे वाफेवर मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावे. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर पसरावी.

    ई-मेल : ashwinichothe7@gmail.com       (क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

    Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

    Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

    Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

    Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

    SCROLL FOR NEXT