गवती चहा
गवती चहा 
ॲग्रो गाईड

अशी करतात गवती चहाची लागवड

औषधी व सुगंधी वनस्पती योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. लागवडीसाठी मध्यम काळी, पोयट्याची जमीन निवडावी.

लागवडीपूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे. लागवडीसाठी ओडी-४४०, सीकेपी-२५, आरआरएल-१६ या जातींची निवड करावी. लागवड ७५ सें.मी. बाय. ७५ सें.मी. अंतराने करावी. हेक्‍टरी २२ हजार ठोंब लागतात. लागवडीनंतर पाच महिन्यांनी पहिली कापणी करावी. त्यानंतरची कापणी दर तीन महिन्यांनी करावी. पहिल्या दोन वर्षांत हेक्‍टरी २० टन ओल्या गवताचे उत्पादन मिळते. गवती चहाच्या तेलामध्ये सिट्रॉलचे प्रमाण ७५ टक्के असते. यामध्ये जीवनसत्त्व अ मोठ्या प्रमाणात असते. तेल रंगाने पिवळसर असून, त्याला लिंबासारखा वास असतो.

- ०२४२६-२४३२९२ औषधी व सुगंधी वनस्पती योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT