फुलशेती सल्ला
फुलशेती सल्ला 
ॲग्रो गाईड

फुलशेती सल्ला

डॉ. सतीश जाधव

सद्यस्थितीत फुलशेती पिकांमध्ये थंडीमुळे कीड- रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेवंती पिकात मावा या किडीचा तर ग्लॅडिओलस या पिकात पाने कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात. शेवंती :

  • फुलांची काढणी करून विक्री करावी. काढणीनंतर फुलांच्या रंग व जातीवरुन फुलांची प्रतवारी करावी. लांब दांड्यांसाठी पुर्ण वाढलेली आणि पुर्ण उमललेली फुले १० -२० सें.मी. लांब दांड्यांसह काढावीत. नंतर त्यांच्या जुड्या बांधून बाजारात पाठवाव्यात.
  • मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास डायमेथोएट २ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
  • ग्लॅडिओलस :

  • ग्लॅडिओलसच्या फुलदांड्यावरील पहिले फुल उमलल्यानंतर फुलदांड्यांची काढणी करावी. काढणी करताना झाडाची खालील ४ पाने शाबुत ठेवून उर्वरित दांडा घारदार कात्रीने कापावा.
  • फुलांच्या रंग व जातीनुसार प्रतवारी करून दांडे बाजारात पाठवावेत. लांबच्या बाजारपेठेसाठी कळी अवस्थेत काढणी करावी.
  • झाडावर ४-५ पाने ठेवून काढणी केल्याने जमिनीखाली वाढणाऱ्या कंदाचे चांगल्यापद्धतीने पोषण होते.
  • पाने कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस २ मि.लि प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
  • संपर्क : डॉ. सतीश जाधव, ९४०४६८३७०९ (अखिल भारतीय समन्वयित पुष्प सुधार प्रकल्प, गणेशखिंड, पुणे)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

    Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

    Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

    Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

    Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

    SCROLL FOR NEXT