करडई वाण - डी.एस.एच.- १८५
करडई वाण - डी.एस.एच.- १८५ 
ॲग्रो गाईड

करडईची अधिक उत्पादनक्षम नवीन जात विकसित

कोजेन्सिस वृत्तसेवा

भारतीय तेलबिया संशोधन संस्थेच्या वतीने डी.एस.एच.- १८५ ही करडईची उच्च उत्पादनक्षम जात विकसित केली आहे. विविध राज्यांत कोरडवाहू व बागायती पद्धतीने या जातीची प्रस्थापित जातींबरोबर चाचणी घेतली असून, प्रस्थापित जातींपेक्षा अधिक उत्पादन मिळाले आहे. प्रस्थापित जातींपेक्षा या जातीत तेलाचे प्रमाणही अधिक असल्याचे आढळून आले आहे. डी.एस.एच.- १८५ ही जात सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टरिलिटी तंत्रज्ञानावर (सी.जी.एम.एस.) आधारित आहे. त्यामुळे या जातीत फुलांचे बीमध्ये रुपांतरण होण्याचे प्रमाण जास्त आहे. ए - १३३ (सी.जी.एम.एस जात) व १७०५-पी २२ (रिस्टोअर लाइन) या दोन जातींच्या संकरातून ही जात विकसित केली आहे. ए-१३३ या जातीमधील सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टरिलिटीचा स्त्रोत कार्थामस ऑक्झिअॅकांथा ही जंगली जात आहे.

उत्पादनक्षमता :  

  • डी.एस.एच. - १८५ या जातीचे कोरडवाहू पद्धतीने सरासरी १४.३ क्विंटल प्रतिहेक्टरी इतके उत्पादन मिळाले आहे. बागायती पद्धतीने २१ क्विंटल प्रतिहेक्टर इतके उत्पादन मिळाले आहे. राष्ट्रीय पातळीवर १७.४ क्विंटल प्रतिहेक्टर इतके सरासरी उत्पादन मिळाले आहे.
  • कोरडवाहू पद्धतीत हेक्टरी ४.१२ क्विंटल तेल उत्पादन मिळाले आहे. बागायती पद्धतीने हेक्टरी ५.७ क्विंटल तेल उत्पादन मिळाले आहे. राष्ट्रीय पातळीवर सरासरी ४.८९ क्विंटल इतके तेलउत्पादन मिळाले आहे.
  • चाचणीदरम्यान सद्य:स्थितीतील उत्कृष्ट जाती ए-१ व पीएनबीएस - १२ या जातींपेक्षा डी.एस.एच.-१८५ जातीने २५ ते ३० टक्के अधिक उत्पादनक्षमता दाखविली असून, सी.जी.एम.एस.तंत्रज्ञानावर आधारित एनएआरआय - एच - १५ या जातीपेक्षा १५.२ टक्के अधिक उत्पादनक्षमता दाखविली आहे. ए-१ व पीएनबीएस - १२ या जातींपेक्षा या जातीचे  तेल उत्पादन २८ ते २९ टक्के अधिक आहे.
  • महाराष्ट्रात ए-१ या वाणाबराेबर प्रक्षेत्रावर केलेल्या तुलनात्मक चाचणीत डी.एस.एच. - १८५ या जातीने बागायती पद्धतीने प्रतिहेक्टरी २१ क्विंटल इतके (ए १ - १६ क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन) दिले. छत्तीसगडमध्ये कोरडवाहू पद्धतीने प्रतिहेक्टरी १७ क्विंटल उत्पादन (ए-१ वाण - प्रतिहेक्टरी ५ क्विंटल ) दिले.  तेलंगणात स्थानिक जात मंजिरापेक्षा कोरडवाहू लागवडीत सुमारे १० क्विंटल अधिक उत्पादन दिले (मंजिरा प्रतिहेक्टरी उत्पादन- ४-५ क्विंटल, तर डी.एस.एच.- १८५ प्रतिहेक्टरी उत्पादन १० - १४ क्विंटल).
  • करडई या पिकावर येणारा फ्युजॅरियम विल्ट या अत्यंत घातक रोगालाही ही जात प्रतिकारक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

    Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

    Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

    Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

    Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

    SCROLL FOR NEXT