रत्नागिरीत टॉमेटो प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये
रत्नागिरीत टॉमेटो प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये 
बाजारभाव बातम्या

रत्नागिरीत टॉमेटो प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कोल्हापूर, बेळगाव येथून आलेल्या विविध प्रकारच्या पालेभाज्या येत आहेत. त्यामध्ये टॉमेटो, फ्लॉवर आणि वांग्याचे दर वधारले आहेत. टॉमेटोला अगोदर क्विंटलला १००० ते २००० रुपये दर होते. मात्र, आता दरात सुधारणा झाली असून, ३००० ते ३५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. भाजीची आवक घटल्यामुळे दर वाढल्याचे बाजार समितीच्या सूत्राकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात भाजीपाला लागवड होत नाही. त्यामुळे रत्नागिरीतील व्यावसायिकांना शेजारील जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागते. नियमित भाजीपाल्यासाठी रत्नागिरीतील मोठे व्यापारी बहुतांशी बेळगाव येथून भाजी घेऊन येतात. त्यापाठोपाठ भाजीपाल्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रावर अवलंबून राहावे लागते. 

शहर परिसरातील काही शेतकरी भाजी पाल्याची  लागवड करतात. मात्र, ते किरकोळ विक्रीवर भर देतात. सद्यःस्थितीत बाजार समितीत २००० नग आवक झालेल्या कोथिंबिरीला १० ते १८ रुपये जुडीला दर मिळाला आहे. कोबीची ४८ क्विंटल आवक झाली असून, कमीत कमी १००० रुपये तर जास्तीत जास्त १५०० रुपये आहे. टॉमेटो तीनशे क्विंटल आणला गेला. त्याचा दर प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये आकरण्यात आला. 

गवारचा दर ३००० ते ४००० रुपये, ४० क्विंटल ढोबळी मिरचीची आवक आहे. तिचा दर क्विंटलला ३००० ते ४००० रुपये आहे. फ्लॉवरची आवक ९१ क्विंटल असून, दर २५०० ते ३५००, भेंडीची आवक ५० क्विंटल असून, दर २००० ते ३००० रुपये, वांग्याची आवक ६० क्विंटल असून, दर १५०० ते २००० रुपये आहे. 

हिरवी मिरचीची ६५ क्विंटल आवक झाली असून त्या मिरचीला ४००० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मेथीची भाजी ६०० नग आवक असून, १० रुपये ते १५ रुपये जुडी दर आहे. कारल्याची आवक १३ क्विंटल असून, ४००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल दर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT