Soybeans rate hit a high of Rs 6,000
Soybeans rate hit a high of Rs 6,000 
बाजारभाव बातम्या

सोयाबीनला उच्चांकी सहा हजारांचा भाव

टीम अॅग्रोवन

लातूर/अकोला ः गेल्या काही दिवसांपासून राज्यात सोयाबीनचे भाव वाढत आहेत. चार हजारांवरून साडे पाच हजारांवर काही दिवसांपूर्वी सोयाबीन गेले होते. पण त्यात आणखी भर पडली आहे. सोमवारी (ता. पाच) सोयाबीनला सरासरी सहा हजार रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला आहे. चांगला भाव मिळेल म्हणून घरातच सोयाबीन ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. पहिल्यांदाच सोयाबीन सहा हजारी झाले आहे.

मागील आठवड्यात अकोल्यात सोयाबीन ६१०० रुपयांनी विकले होते. सोमवारी (ता. पाच) या बाजार समितीत पुन्हा २५ रुपयांची क्विंटलमागे वाढ दिसून आहे. ६१२५ रुपयांचा कमाल दर मिळाला. सरासरी दरसुद्धा ६००० मिळाला. तर दुसरीकडे वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत तर यंदाचा सर्वाधिक ६३५० रुपयांचा दर मिळाला. वाशीम बाजार समितीत किमान दर ५७५० पासून सुरू झाला. याठिकाणी दीड हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली होती. तर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीतही कमीत कमी दर ५७५० एवढाच मिळाला. सरासरी दर ६००० रुपये एवढा होता.  येथे ७९४ क्विंटल सोयाबीन विक्रीला आले होते.

लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात मोठ्या प्रमाणात दरवर्षी सोयाबीनची आवक असते. पण दरवर्षी चार ते साडेचार हजारांपर्यंतच सोयाबीनला भाव मिळत आहे. पण यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला चार ते साडेचार हजार रुपयापर्यंत भाव राहिला. पण नंतर मात्र भावात वाढ होत गेली आहे.

पाच हजार रुपये काही दिवस भाव राहिला. त्यानंतर पुन्हा त्यात वाढ होत गेली. साडे पाच हजारांवरून ते सहा हजारावर गेले आहे. सोमवारी (ता. ५) सोयाबीनला कमाल सहा हजार १८६ रुपये तर किमान चार हजार ९०१ रुपये प्रतिक्विंटलला भाव राहिला. तर सर्वसाधारण भाव मात्र सहा हजार रुपये प्रतिक्विंटलला राहिला आहे. सध्या पंधरा ते वीस हजार क्विंटल सोयाबीनची आवक आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनला चांगला भाव मिळेल म्हणून घरात तसेच ठेवले होते त्या शेतकऱ्यांना आता फायदा होत आहे. चार पैसे खिशात पडण्यास मदत होत आहे.

लातूर आडत बाजारात सोमवारी उच्चांकी भाव राहिला आहे. सरासरी सहा हजार रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सहा हजारावर पहिल्यांदाच सोयाबीन गेले आहे. सध्या पंधरा हजार क्विंटलपर्यंत आवक आहे. येथे अनेक प्लान्ट आहेत. त्यांना सोयाबीन लागते. प्लान्ट बंद ठेवून चालत नाही. आवक कमी व मागणी जास्त आहे. त्याचाही भावावर परिणाम दिसून येत आहे. - ललितभाई शहा, सभापती, लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT