जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ७००० रुपये
जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ७००० रुपये 
बाजारभाव बातम्या

जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ७००० रुपये

टीम अॅग्रोवन

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. १५) आल्याची २५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ७००० व सरासरी ४५०० रुपये दर मिळाला. आवक पाचोरा, यावल, सिल्लोड (जि. औरंगाबाद) भागातून होत असल्याची माहिती मिळाली. 

बाजारात बुधवारी आंब्याची ३५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० व सरासरी ३००० रुपये दर मिळाला. बीटची १५ क्विंटल आवक झाली. दर १५०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. बी काढलेल्या चिंचेची दोन क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ८००० रुपये दर होता. लिंबाची चार क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ५००० व सरासरी ३१०० रुपये दर मिळाला. कलिंगडाची १५ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ४०० ते १००० व सरासरी ६०० रुपये, बटाट्याची ३५० क्विंटल आवक, तर दर ४५० ते ११०० व सरासरी ७०० रुपये, भेंडीची सात क्विंटल आवक, तर दर १००० ते ३००० व सरासरी १५०० रुपये, कारल्यांची चार क्विंटल आवक, तर दर १५०० ते ३१०० व सरासरी २००० रुपये मिळाला.

लाल कांद्याची ११६५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३०० ते ८२५ व सरासरी ५५० रुपये दर होता. कोबीची १२ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १००० ते २२०० व सरासरी १५०० रुपये दर मिळाला. चवळीची दोन क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ३२०० रुपये, पालकाची ११ क्विंटल आवक, तर दर ६०० ते १५०० व सरासरी ८०० रुपये, गाजरांची आठ क्विंटल आवक, तर दर ६०० ते १२०० व सरासरी ८०० रुपये, हिरव्या मिरचीची २५ क्विंटल आवक, तर दर १५०० ते ३५०० व सरासरी २१०० रुपये दर होता. गिलक्‍यांची दोन क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ३००० रुपये दर मिळाला.

कोथिंबिरीची पाच क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २२०० ते ५५०० व सरासरी ३५०० रुपये दर होता. मेथीची चार क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २००० ते ५००० व सरासरी ३००० रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT