guar is available at Rs 2300 to 4500 in Jalgaon
guar is available at Rs 2300 to 4500 in Jalgaon  
बाजारभाव बातम्या

जळगावात गवार २३०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. २४) गवारीची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २३०० ते ४५०० रुपये मिळाला. आवक जळगाव, भुसावळ, यावल परिसरांतून होत आहे. आवक स्थिर असून, दरही टिकून आहेत.

बाजारात भरताच्या वांग्यांची २७ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १००० ते १७०० रुपयांपर्यंत मिळाले. आल्याची २१ क्विंटल आवक झाली. आल्यास प्रतिक्विंटल २६०० ते ५२०० रुपये दर मिळाला. बटाट्याची २४० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते १९०० रुपये दर होता. भेंडीची २० क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये मिळाला.

टोमॅटोची १० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १४०० ते २००० रुपये मिळाला. कोबीची १६ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १५०० ते २४०० रुपये मिळाला. काटेरी, लहान वांग्यांची १६ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची नऊ क्विंटल आवक झाली. ७०० ते १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मेथीची आठ क्विंटल आवक झाली. मेथीस प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर होता. डाळिंबाची २२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २६०० ते ५००० रुपये दर मिळाला.

लिंबूची पाच क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल ६०० ते १०१०० रुपये दर होता. शेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचिची ३२ क्विंटल आवक झाली. मिरचीला प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये दर मिळाला. पालकची दोन क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० रुपये मिळाला.

गाजराची आठ क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल ११०० ते २५०० रुपये दर मिळाला. बिटची सहा क्विंटल आवक झाली. बिटला प्रतिक्विंटल १८०० ते २८०० रुपये दर मिळाला, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT