हिरवी मिरची, बटाटे, टोमॅटोच्या आवकेत चढउतार
हिरवी मिरची, बटाटे, टोमॅटोच्या आवकेत चढउतार 
बाजारभाव बातम्या

हिरवी मिरची, बटाटे, टोमॅटोच्या आवकेत चढउतार

Santosh Munde

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीसह बटाटे, टोमॅटोच्या आवकेत जुलैअखेर व ऑगस्टच्या पहिल्या पाच दिवसांत चढउतार पाहायला मिळाला. हिरव्या मिरचीची आवक २३ ते १५०  क्‍विंटलपर्यंत; तर टोमॅटोची आवक ७० ते २४४ क्‍विंटल व बटाट्याची आवक ६०० ते १२०० क्‍विंटलदरम्यान झाली.

आवकेतील चढउतार प्रमाणेच टोमॅटो, बटाटे व हिरव्या मिरचीच्या दरातही चढउतार पहायला मिळाला. हिरव्या मिरचीला सरासरी १२५० ते २७५० रुपये प्रतिक्‍विंटल पर्यंत दर मिळाला.

टोमॅटोचे दर ९०० ते २२५० रुपये प्रतिक्‍विंटलपर्यंत  राहिले; तर बटाट्याला १२५० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलपर्यंत दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. अलीकडे ३० जुलैला १५० क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला १२०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT