हिरवी मिरची
हिरवी मिरची  
बाजारभाव बातम्या

कोल्हापुरात हिरवी मिरची दहा किलोस ३०० ते ५०० रुपये

Raj Chougule

कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात ओल्या मिरचीची दररोज तीनशे ते चारशे पोती आवक झाली. ओली मिरचीस दहा किलो ३०० ते ५०० रुपये दर मिळाला. ढोबळी मिरचीस दहा किलोस पाचशे ते सहाशे रुपये दहा किलोस १०० ते २०० रुपये दर मिळाला. गवारीच्या आवकेत मोठी घट झाली. गवारीस दहा किलोस १०० ते २०० रुपये दर मिळाला. ओल्या वटाण्याची दररोज शंभर ते दीडशे पोती आवक झाली. ओल्या वटाण्याला दहा किलोस  ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. दोडक्‍याची शंभर ते दीडशे करंड्या आवक झाली. दोडक्‍यास दहा किलोस १०० ते ३५० रुपये दर होता.  गेल्या सप्ताहापासून भाजीपाला बाजारात मोठी अस्वस्थता आहे. याचा परिणाम या सप्ताहातही पाहावयास मिळाला. दर घसरल्याने अनेक शेतकऱ्यांना भाजीपाला काढणेही परवडत नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी भाजीपाला शेतातच नष्ट करण्यास प्रारंभ केल्याने स्थानिक ठिकाणाहून होणाऱ्या आवकेत घट झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत कोबी, टोमॅटो, फ्लॉवरची स्थानिक भागातून होणारी आवक पंचवीस टक्‍क्यांपर्यंत घटली होती. बेळगाव भागातून मात्र भाजीपाल्याची नियमित आवक सुरू आहे.  कोथिंबिरीची दररोज दहा ते पंधरा हजार पेंढ्यांची आवक होती. कोथिंबिरीस शेकडा ३०० ते ६०० रुपये दर मिळाला. मेथीच्या आवकेतही घट होती. मेथीची दररोज तीन ते पाच हजार पेंढ्या आवक होती. मेथीस शेकडा ३०० ते ५०० रुपये दर होता. फळांमध्ये द्राक्षाची दररोज वीस ते पंचवीस बॉक्‍स आवक झाली. द्राक्षास किलोस २० ते २५ रुपये दर होता. अननसाची नव्वद ते शंभर डझन आवक झाली. अननास डझनास ५० ते ४५० रुपये दर मिळाला.  या सप्ताहात गुळाच्या आवकेत घट झाली. गुळाची दररोज सरासरी पाच हजार रव्यांची आवक झाली. दर मात्र गेल्या सप्ताहाच्या तुलनेत स्थिर होते. गुळास क्विंटलला ३००० ते ४००० रुपये किंवटल इतका दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT