गवार
गवार  
बाजारभाव बातम्या

साताऱ्यात गवारीस दहा किलोस ४०० ते ५०० रुपये

टीम अॅग्रोवन

सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.९) गवार, दोडका, वाटाणा, कोथिंबीर तेजीत आहेत. गवारीची दोन क्विंटल आवक झाली असून, दहा किलो गवारीस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. गवारीस रविवारच्या तुलनेत (ता.७) दहा किलो मागे ५० रुपयांची दरवाढ झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. दोडक्‍याची सहा क्विंटल आवक झाली असून, दहा किलो दोडक्‍यास ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. दोडक्‍यास दहा किलो मागे ५० रुपयांची दरवाढ झाली आहे. वाटाण्याची २६ क्विंटल आवक होऊन दहा किलोस २८० ते ३२० रुपये दर मिळाला. काळा घेवड्याची १२ क्विंटल आवक होऊन दहा किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. शेवग्याची सात क्विंटल आवक होऊन दहा किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. वाल घेवड्याची २५ क्विंटल आवक होऊन दहा किलोस ३०० ते ३५० रुपये दर मिळाला. पावट्याची सहा क्विंटल आवक होऊन दहा किलोस ४०० ते ४५० रुपये दर मिळाला. भेंडीची १२ क्विंटल आवक होऊन दहा किलोस ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. हिरवी मिरचीची १७ क्विंटल आवक, तर दहा किलोस २०० ते २५० रुपये दर मिळाला. वांग्याची १३ क्विंटल आवक होऊन दहा किलोस १५० ते २०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची ५६ क्विंटल आवक तर दहा किलोस ६० ते ८० रुपये दर मिळाला. पालेभाज्यात कोथिंबीर तेजीत आहे. कोथिंबीरीची ३२०० जुड्याची आवक होऊन शेकड्यास २०० ते ३०० रुपये दर मिळाला. मेथीची ३००० जुड्याची आवक होऊन शेकड्यास ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. डाळिंबाची ३० क्रेटची आवक होऊन प्रतिक्रेटला ३०० ते ७०० रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT