Eggplant bharit in Jalgaon is 1800 to 2600 rupees
Eggplant bharit in Jalgaon is 1800 to 2600 rupees 
बाजारभाव बातम्या

जळगावात भरताची वांगी १८०० ते २६०० रुपये

टीम अॅग्रोवन

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. २४) भरताच्या वांग्यांची २२ क्विंंटल आवक झाली. या वांग्यांना प्रतिक्विंंटल १८०० ते २६०० व सरासरी २२०० रुपये प्रतिक्विंंटलचा दर मिळाला. आवक जामनेर, जळगाव, भुसावळ आदी भागांतून होत आहे.

बाजारात मंगळवारी गवारीची दोन क्विंंटल आवक झाली. गवारीला प्रतिक्विंंटल २००० ते ४२०० व सरासरी ३५०० रुपये प्रतिक्विंंटलचा दर मिळाला. मेथीची चार क्विंंटल आवक झाली. मेथीला प्रतिक्विंंटल १२०० ते १६०० व सरासरी १०००  रुपये दर मिळाला.

आल्याची १६ क्विंंटल आवक झाली. दर ३३०० ते ५३००व सरासरी ४१०० रुपये प्रतिक्विंंटल मिळाला. भेंडीची २५ क्विंंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंंटल १००० ते १२०० व सरासरी ९०० रुपये दर होता. 

हिरव्या मिरचीची १७ क्विंंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंंटल २००० ते ३८०० व सरासरी ३००० रुपये प्रतिक्विंंटलचा दर मिळाला. पालकची दीड क्विंंटल आवक झाली. पालकाला प्रतिक्विंंटल १८०० रुपये दर मिळाला. दोडक्‍यांची नऊ क्विंंटल आवक झाली. दोडक्‍याला प्रतिक्विंंटल १५५० ते २५५० व सरासरी १९०० रुपये दर होता. 

गिलक्‍यांची नऊ क्विंंटल आवक झाली. गिलक्‍यास प्रतिक्विंंटल १८०० ते २८०० व सरासरी २४०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची सात क्विंंटल आवक झाली. टोमॅटोला प्रतिक्विंंटल २५०० ते ४४०० व सरासरी ३४०० रुपये दर मिळाला. बीटची आठ क्विंंटल आवक झाली. बीटला प्रतिक्विंंटल १३०० ते २३०० व सरासरी १९०० रुपये दर होता. काशीफळाची २७ क्विंंटल आवक झाली. काशीफळाला प्रतिक्विंंटल ६०० ते ९०० व सरासरी ७०० रुपये दर मिळाला. 

शेवगा १४०० रुपये क्विंंटल

लहान काटेरी वांग्यांची १७ क्विंंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंंटल १६००ते २६०० व सरासरी २००० रुपये दर होता. कोबीची १६ क्विंंटल आवक झाली. दर प्रतिक्विंंटल १७०० ते २७०० व सरासरी २१०० रुपये, असा होता. भोपळ्याची १५ क्विंंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंंटल १४०० ते २२०० व सरासरी १८०० रुपये दर मिळाला. शेवगा शेंगांची दीड क्विंंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंंटल १४०० रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT