In Aurangabad, green gram, urad, sorghum, wheat imports, price fluctuations
In Aurangabad, green gram, urad, sorghum, wheat imports, price fluctuations 
बाजारभाव बातम्या

औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी, गव्हाच्या आवक, दरात चढ-उतार

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत १४ ते १९ सप्टेंबर दरम्यान आठवडाभरात मूग, उडीद, ज्वारी, गहू , बाजरीच्या आवक व दरात चढ-उतार पाहायला मिळाले.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये १८ सप्टेंबरला १०९ क्विंटल आवक झालेल्या बाजरीचे दर १०७० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १९ सप्टेंबरला १०० क्विंटल आवक झालेल्या बाजरीला १०७० ते १४०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.१८ सप्टेंबरला ५ क्विंटल आवक झालेल्या उडदाला ३००० ते ५००० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. १९ सप्टेंबरला २ क्विंटल आवक झालेल्या उडदाला ४००० ते ४५०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला.

१८ सप्टेंबरला २५ क्विंटल आवक झालेल्या मुगाचे दर ४००० ते ५९०० रुपये प्रति क्विंटल राहिले. १९ सप्टेंबरला १० क्विंटल आवक झालेल्या मुगाला ४००० ते ६००० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. १८ सप्टेंबरला २३  क्विंटल आवक झालेल्या ज्वारीला ९५० ते २५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. १९ सप्टेंबरला ज्वारीची आवक ९ क्विंटल तर दर १८०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल राहिले.

१८ सप्टेंबरला १२२ क्विंटल आवक झालेल्या गव्हाला १४७५ ते १८०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. १९ सप्टेंबरला ५२ क्विंटल आवक झालेल्या गव्हाला १४०० ते १६७५ रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT