Dry Drought
Dry Drought Agrowon
ताज्या बातम्या

Drought : शिंदखेडा तालुक्यातील पैसेवारी अन्यायकारक

Team Agrowon

धुळे ः शिंदखेडा तालुक्यातील काही भागांत या वर्षी अत्यंत कमी पर्जन्यमान (Rainfall) झाल्याने त्या भागात कोरड्या दुष्काळाची (Drought) परिस्थिती निर्माण झाली आहे, तर काही भागांत जास्त पाऊस झाल्याने ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहे. असे असताना तब्बल १४३ गावांची लावलेली पैसेवारी अन्यायकारक आहे.

ती ५० पैशांपेक्षा कमी लावावी, तसेच त्या-त्या भागातील स्थिती लक्षात घेता ओला व कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार जयकुमार रावल यांनी केली आहे.शिंदखेडा तालुक्यातील नऊ मंडळांतील १४३ गावांची नजर पैसेवारी ५० पेक्षा कमी राहणे आवश्यक होती. मात्र, सर्वच्या सर्व १४३ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त लावल्याने शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

याबाबत सर्वच मंडळांत लावलेल्या पैसेवारीवर हरकत असून, ही पैसेवारी ५० पेक्षा कमी लावावी, अशी मागणी आमदार रावल यांनी केली आहे. यंदा शिंदखेडा तालुक्यात काही भागांत ओला, तर काही भागांत कोरडा दुष्काळ असल्याने दुष्काळाच्या सवलती व अनुदानही तत्काळ देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांपासून तर राज्य सरकारकडे सुरू आहे.

एवढेच नव्हे तर यंदा शिंदखेडा तालुक्यात कापूस पिकावर लाल्यारोगसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, याबाबतही पंचनामे करून शेतकऱ्यांना काही मदत करता येईल का याबाबतदेखील मागणी आहे. अशातच शासनाच्या प्रतिनिधींनी ज्या पद्धतीने पैसेवारी जाहीर झाली ती अन्यायकारक असून, याला आमचा विरोध असून, त्याचा फेर आढावा घेण्यात यावा, अशी भूमिका आमदार रावल यांनी मांडली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT