Fertilizer supply  Agrowon
ताज्या बातम्या

Fertilizer Supply : जळगावात खतपुरवठा विस्कळीतच

Team Agrowon

Jalgaon news : जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू होणार आहे. पेरणी १०० टक्क्यांपेक्षा अधिक होईल किंवा किमान ९५ टक्के होऊ शकते. खतांची मागणीदेखील चांगली असणार आहे. परंतु खतांचा पुरवठा विस्कळीत असल्याची स्थिती गेले अनेक दिवस आहे. याबाबत कुणीही दखल घेण्यास तयार नाही.

१०.२६.२६, युरिया या खतांची मोठी टंचाई आहे. युरिया कुठेही उपलब्ध नाही. डीएपी, सुपर फॉस्फेट आदी खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. १०.२६.२६ च्या पाच बॅगांसोबत इतर अन्नद्रव्ये किंवा खतांची लिंकिंग सर्रास केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे वित्तीय नुकसान होत आहे. लिंकिंगशिवाय खतेच मिळत नसल्याची स्थिती जळगाव जिल्ह्यात सर्वत्र आहे.

दोन लाख २० हजार टन खत पुरवठा लक्ष्यांक मंजूर करण्यात आला होता. खतपुरवठा ऑगस्टपासून विस्कळीतच आहे. खरिपातील खतेही शिल्लक राहतील, असा दावा कृषी यंत्राणा करीत आहेत. आता खतांची खरिपासाठी मागणी कमी आहे. परंतु केळी, ऊस, भाजीपाला पिकांसाठी खतांची उचल चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, जळगाव भागांत आहेच.

पोटॅशचा पुरवठा खरिपात ७० टक्क्यांवर आहे. युरियाची कोणतीही टंचाई नसल्याची माहिती मध्यंतरी नियोजन समितीच्या बैठकीत देण्यात आली. २२ हजार टन युरिया शिल्लक आहे किंवा ई पॉस यंत्रणेत दिसत आहे, असा दावा केला जात होता. पण युरिया उपलब्धच झाला नाही. युरियाची मागणी रब्बीमध्येही अधिक राहणार आहे.

तृणधान्य व कडधान्य पिकांसाठी युरियाची मागणी अधिक असते. मका लागवड बऱ्यापैकी होणार असल्याने युरियासह संयुक्त खतांची उचल केली जाईल. रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर या केळीसाठी प्रसिद्ध भागात पोटॅशची मागणी आहे.

तसेच १०.२६.२६., डीएपी या खतांची देखील मोठी मागणी आहे. मध्यंतरी पोटॅशचा कमी पुरवठा रावेरात झाला होता. कंपन्यांकडूनच पुरवठा होत नसल्याची माहिती कृषी केंद्रचालक देत आहेत. या स्थितीत रब्बीसाठी खतांचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी केली जात आहे.

लक्ष्यांक मंजूर केला जातो, पण खते मिळत नाहीत

रब्बीसाठी सुमारे ९५ हजार टन युरियाचा पुरवठा जानेवारी अखेर होणार आहे. तर संयुक्त खतांचा सुमारे ४० हजार टन एवढा पुरवठा होईल. पोटॅशचा सुमारे ३० हजार टन आणि सुपर फॉस्फेटचा सुमारे ३० हजार टन एवढा पुरवठा होईल. खरिपात मंजूर लक्ष्यांकाच्या तुलनेत युरिया, १०.२६.२६ चा पुरवठाच हवा तसा झाला नाही. यामुळे लक्ष्यांक मंजूर केला जातो, पण खते मिळत नाहीत, अशी स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT