Rabbi Season
Rabbi Season Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Sowing : रब्बीच्या २० टक्के पेरण्या

Team Agrowon

पुणे : गेल्या काही दिवसांपासून थंडी (Cold Weather) वाढू लागली आहे. जिल्ह्यात रब्बीच्या (Rabi Season ) शेतीकामांना वेग आला आहे. काही ठिकाणी ज्वारी, गहू, हरभरा पिकांच्या पेरणीची (Wheat, Chana Sowing) लगबग सुरू झाली आहे. रब्बीचे एकूण दोन लाख २९ हजार ७१२ हेक्टर क्षेत्र आहे. आतापर्यंत ४६ हजार ५९३ हेक्टर म्हणजेच सरासरी २० टक्के पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या (Agriculture Department) सूत्रांनी दिली.

गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात हवामान कोरडे झाले आहे. त्यामुळे खरिपातील रखडलेल्या पिकांच्या काढणीला वेग आला आहे. त्यातच जिल्ह्यातील पूर्व भागातील दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, उत्तर भागातील खेड, शिरूर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांत टोमॅटो, बटाटा, सोयाबीन, बाजरी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला. आर्थिक चणचणी भासत असल्याने शेतकरी कर्ज काढून रब्बीची तयारी करू लागला आहे. रब्बीत गहू व हरभरा पिकांच्या क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज आहे.

पुणे जिल्ह्यात रब्बीचे

सरासरी क्षेत्र ( हेक्टरमध्ये)

पीक सरासरी

क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र

ज्वारी १,३४,३३६ ३५९०७

गहू ३९,८०३ ४८६

मका १६,९४७ ७५५८

इतर तृणधान्य २७१ १०

हरभरा ३४,३३० १७१८

इतर कडधान्य ३८२९ ४०४

करडई २३ २१

तीळ ५ १

जवस ११ ०

सूर्यफूल ६६ ४५

इतर गळीतधान्य ९१ ६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT