Gavran Mango Season : हापूस नंतर आता चाखा गावरान आंब्याचा गोडवा

Team Agrowon

कोकण हापूसचा हंगाम संपत आला असून, आता पुणे जिल्ह्यातील पश्‍चिम घाट परिसरातील गावरान आंब्यांच्या हंगामाला प्रारंभ झाला आहे.

Gavran Mango Season | Agrowon

पारंपरिक हापूससह केसर आणि स्थानिक रायवळ, पायरीसह विविध वाणांची आवक होत आहे.

Gavran Mango Season | Agrowon

पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाल्यावर गावरान आंब्यांच्या हंगामाला सुरुवात होते.

Gavran Mango Season | Agrowon

गावरान आंब्याची आवक अजून वाढून हंगाम जोमात जून अखेरपर्यंत सुरू राहील.

Gavran Mango Season | Agrowon

कोकण हापूसचा हंगाम संपत आल्याने गावरान आंब्यांना मागणी वाढली आहे. आवक वाढत असल्याने गावरानची खरेदी सुरू होते.

गावरान आंब्याला घरगुती ग्राहकांसह किरकोळ विक्रेत्यांकडून मागणी असते.

विविध प्रकारच्या गावरान आंब्याची आवक प्रामुख्याने मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, तर केसरची आवक बारामती, इंदापूर, दौंड, पारनेर या तालुक्यांमधून होत आहे.