sandeep Shirguppe
आपल्या रक्तामध्ये मेणासारखा पदार्थ असतो जो आपल्या शरीरासाठी आवश्यक असतो. या मेणयुक्त पदार्थाला कोलेस्टेरॉल म्हणतात.
कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे चांगले कोलेस्टेरॉल आणि वाईट कोलेस्टेरॉल.
मेडिकल न्यूज टुडेच्या अहवालानुसार, १९ वर्षांपर्यंतच्या तरुणांच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी १७०mg/dl पेक्षा कमी असावी.
२० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांच्या शरीरात एकूण कोलेस्ट्रॉल १२५-२०० mg/dl दरम्यान असावे.
२० वर्षांवरील महिलांच्या शरीरातील एकूण कोलेस्ट्रॉल १२५- २०० mg/dl दरम्यान असावे.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचे असेल तर वजन कमी करावे. यासाठी नियमितपे योगा, व्यायाम करावा.
फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. आहारात साखर आणि मीठाचे सेवन कमी करावे. जंक फुड आणि फास्ट फूड खाणे टाळावे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.