Tractor Agriculture : ट्रॅक्टरची खरेदी करताना घ्या या गोष्टींची काळजी!

Team Agrowon

गिअरची संख्या

गिअरची संख्या जास्त असावी. तसेच प्रत्येक गिअरने मिळणाऱ्या वेगात योग्य फरक असावा. म्हणजेच ट्रॅक्टरची अवजारे ओढण्याच्या ताकदीमधील काही ताकद जास्त वेगानेसुद्धा मिळू शकते.

Electric Tractor | Agrowon

उदा. ‘अ’ आणि ‘ब’ हे दोन ट्रॅक्टर आहेत. त्यातील ‘अ’ ट्रॅक्टरला चार गिअर असून, ‘ब’ ट्रॅक्टरला तीन गिअर आहेत. त्याच्या ताकदीच्या केलेल्या चाचणीतून मिळालेली निरीक्षणाच्या आधारावर काढलेले निष्कर्ष पुढील प्रमाणे...

Agriculture Tractor | Agrowon

ट्रॅक्टर ‘अ’ मध्ये जास्त गिअर असल्यामुळे ट्रॅक्टरच्या ओढ शक्तीच्या मर्यादेत आपण जास्त वजन जास्त वेगाने ओढू शकतो. त्यामुळे ट्रॅक्टर ‘अ’ हा ‘ब’ पेक्षा चांगला ठरतो.

Electric Tractor | Agrowon

ट्रॅक्टर वापराचा खर्च :

डिझेलच्या किमती वाढतच चालल्या आहे. अशा स्थितीमध्ये कमी इंधनावर चालणारा ट्रॅक्टर केव्हाही सरस. यामुळे भारतीय मानक संस्थेने इंधन खर्चाच्या काही मर्यादा घातलेल्या आहेत.

Electric Tractor | Agrowon

ही मर्यादा ट्रॅक्टरच्या पी. टी. ओ. शक्तीवरून ठरते. ही मर्यादा १०० ग्रॅम / हॉ. पॉ. / तास - ५० हॉ. पॉ.च्या ट्रॅक्टरसाठी ठरलेल्या आहेत.

Electric Tractor | Agrowon

देखभाल, दुरुस्तीचा खर्च :

काही वेळा ट्रॅक्टर कमी इंधन खात असला तरी त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी लागणारा खर्च जास्त असू शकतो. त्यामुळे सर्व बाजूंनी व्यवस्थित पडताळणी करून निर्णय घ्यावा.

Agriculture Tractor | Agrowon