Mahesh Gaikwad
जवस हे तेलबिया वर्गातील पीक आहे. याची लागवड रब्बी हंगामात केली जाते.
जवसाच्या बियांपासून तेल काढले जाते. याला सुपर फूड असेही म्हटले जाते.
जवसापासून फक्त तेलंच नाही तर किमती धागेही तयार केले जातात.
जवसापासून धागे तयार करण्यासाठी याचे पीक मुळाजवळ कापून घेतात. पीकाची कापणी केल्यानंतर पिकापासून जवस बी वेगळे केले जाते.
त्यानंतर कापलेले पीक उन्हात वाळायला ठेवतात. त्यानंतर ३-४ दिवस पाण्यामध्ये बुडवून ठेवले जाते.
पाण्यात भिजवल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घेतात आणि मोकळ्या हवेत सुखवण्यासाठी ठेवतात.
त्यानंतर वाळलेल्या जवसाचे पीक धागे बनविण्याच्या एका विशिष्ठ यंत्रामध्ये घातले जातात. त्यातून धागे तयार केले जातात.