Summer Heat : यंदा चा उन्हाळा असणार लयचं कडक!

Team Agrowon

महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्ण लाटा येणार आहेत. उन्हाळ्यात एल-निनो स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

Summer Heat | Agrowon

यंदाच्या उन्हाळ्यातील (मार्च ते मे) तापमानाचा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय महापात्रा यांनी शुक्रवारी (ता. १) जाहीर केला. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात देशाचे किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक होते.

Summer Heat | Agrowon

१९०१ पासूनच्या नोंदीनुसार सरासरीपेक्षा अधिक किमान तापमानात यंदाचा फेब्रुवारी महिना दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Summer Heat | Agrowon

फेब्रुवारीत देशात सरासरी १४.६१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. २०१६ मध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक १४.९१ अंश सेल्सिअस सरासरी किमान तापमानाची नोंद झाली होती.

Summer Heat | Agrowon

मार्च महिन्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे.

Summer Heat | Agrowon

विदर्भात कमाल तापमान सरासरी इतके राहणार असल्याने या महिन्यातच उन्हाच्या झळा वाढणार आहेत.

Summer Heat | Agrowon

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाना, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तमिळनाडू राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता आहे.

Summer Heat | Agrowon