Aslam Abdul Shanedivan
केंद्र सरकारने देशातील तांदळाच्या किंमती आटोक्यात ठेण्यासाठी बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध घातली.
पण विदेश नितीच्या धोरणानुसार सरकारने टांझानिया, जिबूती आणि गिनी बिसाऊ या देशांना तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.
केंद्र सरकारने टांझानियाला ३० हजार मेट्रिक टन बिगर बासमती तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.
तसेच केंद्राने जिबूती आणि गिनी बिसाऊ या देशांना देखील ३० हजार मेट्रिक टन तुकडा तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.
निर्यात नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) च्या मार्फत होणार आहे.
निर्यात बंदी दरम्यान नेपाळ, मलेशिया, फिलीपिन्स, भूतान, मॉरिशस, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरातीसह आशियाई आणि आफ्रिकन देशांना तांदूळाच्या निर्यातीला परवानगणी देण्यात आली होती.