Team Agrowon
व्हॅलेंटाइन डे मार्केटसाठी लाल गुलाबांना विशेष मागणी असते. त्यातच यंदा लग्नसराई व व्हॅलेंटाइन डे एकत्र आल्याने मागणी वाढून फुलांची लाली खुलली.
यंदा घाऊक बाजारात दांडीच्या गुलाबाला १२ ते १८ रुपये दर मिळाल्याने गुलाब फूल उत्पादक शेतकरी व फुलविक्रेत्यांनी सांगितले. यंदाच्या वर्षी बाजारात उत्साह दिसून आला.
व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने बाजारपेठेत विशेष मागणी असल्याने शेतकऱ्यांनी उत्पादनाच्या अंगाने नियोजन केले. मात्र वातावरण बदलाचा फटका बसला.
अनेक ठिकाणी डाऊनी व तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनावर परिणाम दिसून आला. त्यामुळे मागणीच्या तुलनेत यंदा आवक कमी असल्याने गुलाबाचे दर यंदा टिकून राहिल्याचे दिसून आले.
लाल रंग, लांब दांडी यांसह हिरवी पाने अशा आकर्षक फुलांना मागणी असते. बाजारपेठेत ‘टॉप सिक्रेट’ व ‘बोर्डेक्स’ या वाणांच्या दांडीसहित गुलाबाची मागणी वाढली. मात्र तुलनेत ‘टॉप सिक्रेट’ला अधिक दर मिळाले.
नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने तपोवन, मखमलाबाद, आडगाव तसेच दिंडोरी तालुक्यातील मोहाडी, जानोरी, आंबे व शिवनई परिसरांत मोठ्या प्रमाणावर पॉलिहाउसमध्ये उत्पादित फुलांचा पुरवठा स्थानिक नाशिक बाजारात झाला.
फुलांचा पुरवठा मुंबई, नागपूर, दिल्ली, भोपाळ, अहमदाबाद, सुरत, बडोदा येथे करण्यात आला. यंदा ‘व्हॅलेंटाइन डे’साठी चांगली मागणी दिसून आली. प्रतिफूल सरासरी १२ ते १५ रुपये दरम्यान विकले गेले.
मागील वर्षीपेक्षा यंदा उत्पादन तुलनेत कमी होते. मात्र मागील वर्षी उत्पादन चांगले होते तर यंदा तुलनेत दर वाढले. फुलांची मागणी वाढत असल्याने यंदा बाजारात उत्साह दिसून आला.
Agristack Scheme : कृषी क्षेत्राला डिजिटल युगाशी जोडणारी सरकारची ॲग्रिस्टॅक योजना!