sandeep Shirguppe
हिवाळ्यात पेरू अतिशय चविष्ट आणि अँटिऑक्सिडंट, पोटॅशियम आणि फायबर, तसेच व्हिटॅमिन सी भरपूर असते.
दररोज पेरू खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी, हृदयाचे आरोग्य, पचनसंस्थेसाठी फायदा होतो.
तज्ज्ञांच्या मते, पेरूमध्ये संत्र्यापेक्षा ४ पट जास्त व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे अनेक रोगांपासून शरीराचे संरक्षण करते.
पोटॅशियमचे संतुलन सुधारण्यास मदत करतात. म्हणूनच रक्तदाब आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.
थायरॉईड, चयापचय नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी पेरू फायदेशीर आहे.
पेरू व पाने व्हिटॅमिन सी आणि लोहाचा उत्तम स्रोत आहेत. सर्दी, खोकल्यासाठी पेरू प्रभावी ठरतो.
तज्ज्ञ सांगतात, कच्चा पेरू श्लेष्माची निर्मिती कमी करण्यासाठी चांगला आहे.
पेरू हे लाइकोपीन, क्वेर्सेटिन आणि पॉलीफेनॉल सारख्या अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहेत.