Jamun Fruit Rate : जांभळाला मिळतोय किलोला ४०० रुपये दर

Team Agrowon

यंदा बाजारात जांभळे उशिराच दाखल झाली आहेत. जांभूळ आरोग्यदायी आणि हंगामी फळ असल्याने त्याची चव घेण्यासाठी खवय्ये आतुरतेने वाट पाहत असतात.

Jamun Fruit Rate | Agrowon

सध्या एक किलो जांभळाचा दर ४०० रुपयांपुढे गेला आहे. मधुमेहात जांभूळ गुणकारी असल्याने त्याला सोन्याचा भाव आला आहे.

Jamun Fruit Rate | Agrowon

रानमेवा म्हणून भेटणाऱ्या जांभळाला फळांच्या पंगतीत वरचे स्थान प्राप्त झाले आहे.

Jamun Fruit Rate | Agrowon

उपलब्धतेनुसार दरवाढ असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जांभळात ब्लूबेरीच्या तुलनेत जास्त फायबर असते. ज्यामुळे मधुमेहींसाठी जांभळाचे सेवन हा उत्तम पर्याय ठरतो.

Jamun Fruit Rate | Agrowon

जांभूळ फळामध्ये व्हिटॅमिन सी, लोह आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. लोह हिमोग्लोबिनची पातळी सुधारते आणि रक्त नैसर्गिकरीत्या शुद्ध करते.

Jamun Fruit Rate | Agrowon

पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करते. ब्लूबेरी हे व्हिटॅमिन के, मँगनीजचे समृद्ध स्त्रोत आहेत; परंतु त्यामध्ये व्हिटॅमिन सी कमी प्रमाणात आहे.

Jamun Fruit Rate | Agrowon

जांभळात असणारी संयुगे कोलेस्टेरॉल जमा होण्याचे प्रमाण कमी करते.

Jamun Fruit Rate | Agrowon
आणखी पाहा