Mahesh Gaikwad
भारतामध्ये शेतीपूरक धंदा म्हणून पशुपालनाचे विशेष महत्त्व आहे. पशुपालनात गायी-म्हशी, शेळी-मेंढी असे प्राणी आपल्याकडे पाळले जातात.
पण जगात असे एक गाव आहे, ज्या गावात चक्क सापांची शेती केली जाते. हो हो तुम्ही बरोबरंच ऐकलं.
सापाचे नाव ऐकताच अनेकांची भंबेरी उडते. साप हा पृथ्वीवरील सर्वात खतरनाक जीवांपैकी एक आहे. साप चावल्यामुळे मनुष्याचा मृत्यूसुध्दा होवू शकतो.
यामुळेच मनुष्य सापांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. पण चीनमधील झेजियांग प्रांतातील एका गावामध्ये चक्क सापांचीच शेती केली जाते.
झेजियांग प्रांतातील जिसिकीयाओ या गावातील लोक आपल्या घरांमध्ये शेकडोच्या संख्येने साप पाळतात. या सापांवरच या गावातील लोकांचा उदर्निर्वाह अवलंबून आहे.
जिसिकीयाओ या गावातील लोक दरवर्षी ३० लाख सापांची शेती करतात. १९८० सालापासून या गावामध्ये सापांच्या शेतीची परंपरा सुरू झाली.
या गावातील लोक शेतात पिकांची शेती करण्याऐवजी सापांची शेती करतात. हे सापच गावातील लोकांच्या उत्पन्नाचे साधन आहे.
चीनमध्ये प्राचीन काळापासून विषारी सापांचा वापर पारंपरिक औषधे बनविण्यासाठी केला जातो. जिसिकीयोओ गावात १०० हून अधिक स्नेक फार्म आहेत.
जिसिकीयाओ गावामध्ये सुरूवातील त्वचेचे रोग बरे करण्यासाठी सापांची शेती केली जात होती. परंतु आता कर्करोगासारख्या आजारांसाठीही सापांचा वापर केला जातो.