Food Adulteration : अशी ओळखा विविध पदार्थातील भेसळ

Team Agrowon

दुधात भेसळ

दुधात प्रामुख्याने पाणी, मक्याचे पीठ, साखरेचे पीठ, निरमा पावडर अशा पदार्थांची भेसळ केली जाते.दुधात पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी एक ताटामध्ये एक दुधाचा थेंब टाका. जर दूध शुद्ध असेल तर थेंब हळूहळू खाली जाईल आणि वाहताना त्याचा रंग पांढरा होईल.

Food Adulteration | agrowon

शुद्ध आणि भेसळयुक्त तुपातील फरक 

एका भांड्यामध्ये एक चमचा तूप गरम करण्यासाठी ठेवा. जर तूप लगेचच वितळले आणि त्यास गडद तपकिरी रंग आला तर हे तूप शुद्ध आहे.

Food Adulteration | Agrowon

मधातील भेसळ

एका काचेच्या ग्लासात पाण्यात एक चमचा मध टाकावे. जर मध पाण्यात विरघळले असेल तर ते बनावट आहे.

Food Adulteration | Agrowon

डाळीमध्ये रंगाची भेसळ

एक चमचा डाळीमध्ये एक चमचा पाणी आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडचे काही थेंब टाकावेत. त्यात रंग मिसळला असल्यास तो बाहेर येईल.

Food Adulteration | agrowon

हळदीमध्ये भेसळ

हळदीमध्ये पाण्याचे पाच थेंब आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडचे पाच थेंब मिसळावेत. पावडर भेसळयुक्त असेल तर त्याचा रंग जांभळा किंवा गुलाबी होईल.

Food Adulteration | Agrowon

साखरेतील भेसळ

एक कप पाण्यात दोन चमचे साखर गरम करावी. त्यात खडू पावडर असेल तर ती खाली दिसायला लागेल.

Food Adulteration | agrowon

खाद्य तेलातील भेसळ

पारदर्शक ग्लासमध्ये खोबरेल तेल भरून फ्रीझमध्ये ठेवावे. शुद्ध तेल भेसळयुक्त तेलापेक्षा वेगाने गोठते.

Food Adulteration | agrowon

Donkey Milk : गाढविणीच दूध खरचं औषधी असतं का? आता होणार संशोधन

आणखी पाहा...