Donkey Milk : गाढविणीच दूध खरचं औषधी असतं का? आता होणार संशोधन

Team Agrowon

लॅक्‍टोजचे प्रमाण अधिक आणि फॅट कमी असलेले गाढविणीचे दूध अनेक आजारांवर प्रभावी ठरू शकते. त्यामुळे या दुधातील औषधी गुणधर्मांचा अभ्यास महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठअंतर्गत असलेल्या उदगीर येथील पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयातील तज्ज्ञ करीत आहेत.

Donkey Milk | Agrowon

गाढविणीचे दूध मानवी आरोग्यासाठी उपयुक्‍त असल्याचे संशोधनाअंती समोर आले आहे. गाढविणीचे दूध मानवी दुधासारखे आहे. या दुधात ९० टक्‍के पाणी असते.

Donkey Milk | Agrowon

लॅक्‍टोजचे प्रमाण अधिक तर फॅट कमी आहे. दुधातील जिवाणू, बुरशीजन्य रोग प्रतिकारक्षमतेविषयी अभ्यास होणार आहे.

Donkey Milk | Agrowon

लहान मुलांच्या पोटदुखीवर हे दूध प्रभावी ठरते का, याचाही अभ्यास ‘माफसू‘कडून होणार आहे. हे दूध हायपोॲलर्जेनिक असून त्यामुळे यात ॲलर्जी कमी करण्याची क्षमता आहे.

Donkey Milk | Agrowon

या दुधाचा साबण, क्रीम, सौंदर्यप्रसाधनामध्ये वापर करण्याबाबतही विशेष अभ्यास करण्यात येणार आहे.

Donkey Milk | Agrowon

एक गाढवीण दर दिवसाला सरासरी ८०० मिलि दूध देऊ शकते. गाढविणीचे आरोग्य, आहार, वातावरण असे अनेक घटक दूध उत्पादनावर परिणाम करतात.

Donkey Milk | Agrowon

या दुधामध्ये प्रथिने १.५ ते १.८, फॅट ०.२ ते १.०, लॅक्‍टोज ६.० ते ७.०, कॅल्शिअम ०.१ ते ०.२, लॅक्‍टोफेरिन ०.२ ते ०.०३, जीवनसत्त्व बी ०.०३, जीवनसत्त्व अ ०.०५, जीवनसत्त्व ड ०.०००५ टक्‍का असते.

Donkey Milk | Agrowon

Garlic For Health : उपाशीपोटी लसणाच्या २ पाकळ्या चघळा अन् आश्चर्यकारक फायदे पाहा

आणखी पाहा...