Drone Pilot Training : वनामकृवि मध्ये सुरु होणार ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था

Team Agrowon

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये परभणी येथे अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्‍था स्‍थापन करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व मुंबई येथील मे. ग्राउंडजिरो एरोस्‍पेस लिमिटेड यांच्‍यात नुकताच (ता. ५) सामंजस्य करार करण्‍यात आला.

Drone Pilot Training | Agrowon

कृषिक्षेत्रात काटेकोर व अचूक पद्धतीने विविध कामे करण्यासाठी ड्रोनचा वापर वाढणार आहे. विविध पिकांत कीड-रोग व्‍यवस्‍थापन, अन्नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, पाणी व्यवस्थापनासाठी, शेतातील माहिती संकलन यासाठी ड्रोनचा वापर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

Drone Pilot Training | Agrowon

ड्रोनच्या वापरासाठी नागरी विमान वाहतूक संचालनालयाने ड्रोन वापराबाबत नियम आखून दिले आहेत.

Drone Pilot Training | Agrowon

ड्रोन चालविण्यासाठी ड्रोन पायलट परवाना नागरी विमान वाहतूक संचालनालयाने अधिकृत केलेल्‍या ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेकडून घ्यावा लागतो. या करारामुळे पीकनिहाय ड्रोन वापर संशोधनास चालना मिळेल.

Drone Pilot Training | Agrowon

शास्त्रशुद्ध पद्धतीने फवारणी करणे, फवारणीसाठी विविध प्रकारांचे नोझल तयार करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करून योग्‍य गतीने, काटेकोरपणे फवारणी करणे याबाबत प्रशिक्षण व संशोधन कार्यास चालना मिळेल.

Drone Pilot Training | Agrowon

राष्‍ट्रीय पातळीवरील समितीने नऊ पिकांमध्ये ड्रोनचा सुरक्षित व कार्यक्षम वापराबाबत निश्‍चित केलेली प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) केंद्रीय कृषी व शेतकरी कल्‍याण मंत्रालयाच्‍या कृषी, सहकार व शेतकरी कल्‍याण विभागाने प्रसारित केली आहेत.

Drone Pilot Training | Agrowon

मृदा व पीक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापनाबाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्‍चित करण्यासाठी डॉ. इंद्र मणी यांच्‍या अध्‍यक्षतेखालील समितीचे कार्य चालू आहे. ही समिती विविध पिकांमध्‍ये ड्रोन वापराबाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्‍चित करणार आहे.

Drone Pilot Training | Agrowon