Button Flower Farming : सजावट, हार, तोरणासाठी लागणाऱ्या बटण फुलांची शेती

Team Agrowon

चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची बटन फुलांच्या शेतीला पसंती मिळत आहे. सजावटी तसेच हार, तोरणांमध्ये ही बटन फुले मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.

Button Flower Farming | Agrowon

बटन फुलांना बाजारात मोठी मागणी असून लग्नसराई, सण उत्सवाच्या काळात भावही चांगला मिळतो. रोपवाटीकांमधून या फुलांच्या रोपांना मोठया प्रमाणावर मागणी आहे.

Button Flower Farming | Agrowon

सध्या ही फुले गडद जांभळ्या रंगात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून काही ठिकाणी ती गडद लाल (चेरी) आणि पांढऱ्या रंगातही आहेत, तसेच फुलांची टिकवण क्षमताही चांगली आहे.

Button Flower Farming | Agrowon

जमिनीची नांगरणी करून रोटावेटरच्या साह्याने बारीक करून घ्यावी. रिझरच्या सहाय्याने साडेचार ते पाच फूट रुंदीचा व एक ते दीड फूट उंचीचा गादीवाफा तयार करावा.

Button Flower Farming | Agrowon

रोप लागवडीनंतर पंधरा दिवसांनी प्रत्येक रोपाचा शेंडा मोडून टाका खोडातील फुटव्यांची संख्या वाढते व झाड डेरेदार तयार होते.

Button Flower Farming | Agrowon

झाडांना आधार मिळावा यासाठी बांबू, कारव्या, तार वापरून बागेची उभारणी करून सुतळीच्या साह्याने बांधणी करावी.

Button Flower Farming | Agrowon

झाडाच्या मजबूतीसाठी व फुलांचा रंग कायम राखण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट बोरॉनची फवारणी करावी. बाजारामध्ये दांडी फुलाला मोठी मागणी असल्याने दांडीसह फुलांची तोडणी करावी.

Button Flower Farming | Agrowon

Tuberose Variety : कुंडीतही लावता येण्यासारखी निशिगंधाची नविन जात ‘सह्याद्री वामन’

आणखी पाहा