Team Agrowon
पुणे येथील पुष्प संशोधन संचालनालयाने निशिगंधाचा फुलदाण्यांमध्ये (फ्लॉवर पॉट) लागवड होणारा आणि जास्त सुंगध देणारा ‘सह्याद्री वामन’ हा नवीन वाण विकसित केला आहे.
या वाणाचे व्यावसायिकीकरण करण्यात आले असून, हा वाण आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. याबाबतचा सामंज्यस्य करार नुकताच झाला आहे.
निशिगंधाच्या लहान कुंडीमध्ये लागवड करणाऱ्या आणि घरात, हॉटेल, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये सुगंधी ताजी फुले उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने गेल्या ८ वर्षांपासून या वाणावर संशोधन सुरू होते.
हा वाण उंचीने केवळ ५० सेंटिमीटर आहे. कुंडीत लागवडीसाठी अतिशय उपयुक्त आहे. तर फुलधारणा झाल्यानंतर पुढील तीन वर्षे हे झाड उपयुक्त असेल. या करारामुळे या वाणाचे दर्जेदार कंद शेतकऱ्यांना मिळतील.
पाच वर्षांच्या संशोधन आणि ३ वर्षांच्या विविध चाचण्यांनंतर आता हा ‘सह्याद्री वामन’ शेतकऱ्यांना आणि नर्सरी उद्योगासाठी मिळेल.
हा वाण कुंड्यांसाठी विकसित केला आहे. निशिगंधाचा पुष्पगुच्छ बनविण्यासाठी तो वापरला जाईल.