Anuradha Vipat
राशी भविष्यात १२ राशी आहेत. त्या १२ राशी व्यक्तीचे भविष्य वर्तवतात. प्रत्येक राशीचे विशिष्ट वैशिष्ट्ये आणि गुणधर्म आहेत
कुंभ राशीचे लोकं विचारवंत असतात तर मीन राशीचे लोकं सहानुभूतीशील आणि भावनिक असतात
मेष राशीचे लोक उत्साही, धाडसी आणि नेतृत्व करणारे असतात. वृषभ राशीचे लोकं शांत आणि स्थिर असतात.
मिथुन राशीचे लोकं जिज्ञासू, बोलके असतात तर कर्क राशीचे लोकं भावनाप्रधान, संवेदनशील असतात.
सिंह राशीचे लोकं आत्मविश्वासू आणि नेतृत्व करणारे असतात तर कन्या राशीचे लोकं व्यावहारिक असतात.
तूळ राशीच्या लोकांचे सामाजिक संबंध चांगले असतात तर वृश्चिक राशीचे लोकं तीव्र आणि रागीट असतात
धनु राशीचे लोकं उत्साही आणि तत्वज्ञानी असतात तर मकर राशीचे लोकं व्यवहारी, आणि कठोर परिश्रमी करणारे असतात.