Zero Tillage: शून्य मशागत खरंच फायदेशीर की तोट्याची?

Swarali Pawar

शून्य मशागत

शून्य मशागत म्हणजे नांगरणी न करता शेती करणे. पण ती प्रत्येक जमिनीत आणि पिकात फायदेशीरच असेल असं नाही.

Is Zero Tillage farming | Agrowon

फायदे

मातीतील सेंद्रिय कर्ब वाढतो आणि रचना सुधारते. ओलावा टिकतो आणि मशागतीचा खर्च कमी होतो.

Is Zero Tillage farming | Agrowon

कोणत्या जमिनीत टाळावी?

काळी, चिकण, क्षारपड किंवा भारी जमिनीत शून्य मशागत योग्य नाही. अशा जमिनीत माती मोकळी करण्यासाठी मशागत गरजेची असते.

Is Zero Tillage farming | Agrowon

कोणत्या जमिनीत फायदेशीर?

हलकी आणि मध्यम जमीन शून्य मशागतीसाठी योग्य ठरते. जिथे माती भुसभुशीत आणि कमी चिकण असते तिथे चांगला परिणाम मिळतो.

Is Zero Tillage farming | Agrowon

खोल मुळांच्या पिकांसाठी नाही

ऊस, कापूस, हळद यांसारख्या पिकांना मोकळी जमीन आवश्यक असते. त्यामुळे या पिकांसाठी शून्य मशागत टाळावी.

Is Zero Tillage farming | Agrowon

कोणत्या पिकांसाठी योग्य?

गहू, ज्वारी, मका, बाजरी, हरभरा यांसाठी फायदेशीर ठरते. भाजीपाला पिकांमध्येही काही प्रमाणात वापर करता येतो.

Is Zero Tillage farming | Agrowon

तण नियंत्रण आवश्यक

शून्य मशागत केली तरी तण नियंत्रण करावंच लागतं. खुरपणी आणि इतर उपाय नियमित करणे गरजेचे आहे.

Is Zero Tillage farming | Agrowon

निर्णय कसा घ्याल?

जमिनीचा प्रकार आणि पिकानुसार निर्णय घ्या. योग्य नियोजन केल्यास शून्य मशागत फायदेशीर ठरते.

Is Zero Tillage farming | Agrowon

Cotton Varieties: एल निनोमुळे कपाशी वाणाची निवड आणि चांगले उत्पादन कसे घ्यावे?

Agrowon
अधिक माहितीसाठी...