Anuradha Vipat
कारल्याचा कडूपणा आवडत नाही म्हणून अनेक जण ही पौष्टिक भाजी खाणे टाळतात.
आज आपण अस्सल गावरान पद्धतीची, अजिबात कडू न होणारी आणि जिभेची चव वाढवणारी झणझणीत कारल्याची भाजी कशी बनवायची याची सोपी रेसिपी पाहणार आहोत.
गावरान कारली,कांदा,चिंचेचा कोळ ,गूळ,शेंगदाण्याचा कूट,लसूण-आले पेस्ट,कढीपत्ता आणि कोथिंबीर,कांदा-लसूण मसाला , हळद, धणे पावडर,तेल आणि मोहरी-जिरं,मीठ.
कारली स्वच्छ धुवून घ्या. गोल चकत्या करून घ्या कापांना हळद आणि मीठ लावून २० मिनिटे ठेवा. नंतर कडू पाणी काढून टाका. चमचे तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि १ चिमूट हिंग टाका. त्यानंतर कांदा घालून तो हलका गुलाबी होईपर्यंत छान परतून घ्या.
कांदा परतल्यावर त्यात आले-लसूण पेस्ट घाला. त्यानंतर हळद, धणे पावडर आणि कांदा-लसूण मसाला टाकून तेल सुटेपर्यंत परता. तयामध्ये कारली टाका आणि तेलात ५ मिनिटे मध्यम आचेवर उघडीच परतून घ्या.
कारले थोडे मऊ झाल्यावर त्यात चिंचेचा कोळ, किसलेला गूळ आणि चवीनुसार थोडे मीठ घाला. थोडे पाण्याचे हबके मारून मंद आचेवर झाकण ठेवून ५ ते ७ मिनिटे भाजी वाफेवर शिजवून घ्या. भाजी पूर्ण शिजल्यावर वरून भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. २ मिनिटे परतून गॅस बंद करा.
तुमची गरमागरम, झणझणीत आणि अजिबात कडू न होणारी गावरान कारल्याची भाजी तयार आहे! ही भाजी ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते.