Anuradha Vipat
गणेश चतुर्थी २०२६ सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी येत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी घराघरात मखराची सजावट आणि पूजास्थळाची तयारी वेगाने सुरू आहे.
वास्तू शास्त्रानुसार देवघरातील किंवा उत्सवासाठी आणलेल्या मूर्तीची दिशा घरातील सकारात्मक ऊर्जा, सुख आणि समृद्धी ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
बाप्पाची मूर्ती स्थापन करताना ईशान्य दिशा ही वास्तू शास्त्रात सर्वात शुभ आणि सर्वोत्तम मानली जाते
उत्तर दिशा भगवान शंकराची मानली जाते आणि गणेश हा शिवपुत्र असल्याने ही दिशा देखील अतिशय अनुकूल आहे.
बाप्पाची मूर्ती अशा रीतीने ठेवा की, जेव्हा तुम्ही पूजा कराल तेव्हा तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असले पाहिजे
मूर्ती मखरात ठेवताना तिची पाठ भिंतीला स्पर्श करेल अशी ठेवा. बाप्पाच्या पाठीमागे दारिद्र्य आणि समोर सुख-समृद्धीचा वास असतो.
घरगुती पूजेसाठी नेहमी डाव्या बाजूला सोंड असलेली (वाममुखी) मूर्ती अत्यंत शुभ मानली जाते.