Anuradha Vipat
मेकअपचा खरा उद्देश चेहऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य खुलवणे हा असतो, परंतु चुकीच्या पद्धतीने केलेला मेकअप वयाची जाणीव करून देतो.
तुमचा मेकअप तुमचे वय कसे सांगतो आणि ते टाळण्यासाठी काय करावे, हे खालील मुद्द्यांवरून समजून घेऊया.
चेहऱ्यावरील डाग किंवा सुरकुत्या लपवण्यासाठी अनेकजण खूप जाड आणि मॅट फाउंडेशन लावतात. हे फाउंडेशन त्वचेच्या बारीक रेषांमध्ये साचून राहते, ज्यामुळे सुरकुत्या अधिक स्पष्ट दिसतात.
डोळ्यांखालील नाजूक त्वचेवर जास्त पावडर लावल्यास तिथली त्वचा कोरडी पडते आणि हसताना किंवा बोलताना पडणाऱ्या बारीक रेषा ठळकपणे दिसू लागतात.
वयानुसार ओठांचा आकार थोडा पातळ होत जातो. खूप गडद किंवा अतिशय कोरड्या मॅट लिपस्टिक लावल्यास ओठ अधिक पातळ आणि कोरडे दिसतात, ज्यामुळे वय जास्त वाटते.
डोळ्यांच्या खालच्या पापणीवर खूप जाड आणि गडद काजळ किंवा आयलायनर लावल्यास डोळे लहान आणि थकलेले दिसतात. तसेच, काजळ पसरल्यास डोळ्यांखाली काळी वर्तुळे असल्यासारखा भास होतो.
भुवया खूप पातळ कोरल्यास किंवा त्यावर काळ्या पेन्सिलने खूप गडद रेषा ओढल्यास चेहऱ्याचे हावभाव कठोर आणि वयस्कर वाटतात.