Anemia Symptoms : सतत थकवा येतो आणि त्वचा फिकट पडतेय? ही असू शकतात शरीरात रक्त कमी होण्याची लक्षणे

Anuradha Vipat

ऑक्सिजन

जेव्हा शरीरात पुरेशा प्रमाणात निरोगी लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिन नसते, तेव्हा शरीराच्या विविध अवयवांपर्यंत ऑक्सिजन नीट पोहोचत नाही.

Anemia Symptoms | Agrowon

सतत थकवा आणि अशक्तपणा

पुरेशी झोप घेऊनही दिवसभर थकल्यासारखे वाटणे आणि दैनंदिन कामे करताना उत्साह न राहणे हे सर्वात पहिले लक्षण आहे.

Anemia Symptoms | Agrowon

थोड्या श्रमाने धाप लागणे

जिने चढताना, थोडे वेगाने चालताना किंवा किरकोळ काम करतानाही श्वास फुगणे किंवा दम लागणे.

Anemia Symptoms | Agrowon

त्वचा पिवळसर किंवा फिकट दिसणे

चेहरा, तळहात आणि ओठांवरचा नैसर्गिक गुलाबीपणा कमी होऊन त्वचा निस्तेज किंवा पांढरट दिसू लागते.

Anemia Symptoms | agrowon

चक्कर किंवा डोकेदुखी

मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे वारंवार डोके दुखणे, बसल्याजागेवरून उठल्यावर डोळ्यांसमोर अंधारी येणे किंवा चक्कर येणे.

Anemia Symptoms | Agrowon

नखे ठिसूळ होणे

नखांचा रंग फिकट पडतो आणि ती सहज तुटू लागतात किंवा त्यांचा आकार चमच्यासारखा होऊ शकतो.

Anemia Symptoms | agrowon

हृदयाचे ठोके वाढणे

शरीरातील ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी हृदयाला जास्त वेगाने रक्त पंप करावे लागते, ज्यामुळे छातीत धडधड जाणवू शकते.

Anemia Symptoms | agrowon

Kidney Stones Care : हिवाळ्यात किडनी स्टोनचा त्रास वाढतोय? बचाव करण्यासाठी घ्या 'ही' महत्त्वाची काळजी!

Kidney Stones Care | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...