Anuradha Vipat
तरुण पिढी मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी मदत घेण्यास अनेक कारणांमुळे कचरते. चला तर मग आज आपण ती कोणती कारणे आहेत हे पाहूयात.
तरुण पिढीला त्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल बोलताना वेगळे वाटते. त्यांना भीती वाटते की लोक त्यांच्याबद्दल काय विचार करतील.
अनेक तरुणांना मानसिक आरोग्य म्हणजे काय, याची पुरेशी माहिती नसते. त्यांना असे वाटते की त्यांना फक्त शारीरिक त्रास होतो आहे.
मानसिक आरोग्य सेवांसाठी योग्य मार्गदर्शन आणि मदत मिळणे अनेकदा कठीण असते.
पुरुषांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांवर व्यक्त होण्याची भीती जास्त असते. त्यांना असे वाटते की त्यांनी मदतीसाठी पुढे येणे म्हणजे दुर्बळ असणे.
तरुण पिढीवर चांगले दिसण्याचे, चांगले काम करण्याचे आणि यशस्वी होण्याचे खूप जास्त सामाजिक दबाव असतो.
मानसिक आरोग्याच्या समस्यांना आजही समाजात चुकीच्या पद्धतीने पाहिले जाते.
लोकांना वाटते की मानसिक आरोग्य समस्या म्हणजे वेडेपणा. त्यामुळे, तरुण मदत घेण्यास कचरतात.