Mahesh Gaikwad
आजच्या काळात अनेक कामांसाठी आपला इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढला आहे. यामध्ये मोबाईलचा सर्वाधिक वापर आपण करतो.
याशिवाय टिव्ही आणि मोबाईल स्क्रीनचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. दैनंदीन जीवनामध्ये वाढत्या स्क्रीनटाईममुळे अनेकांना डोळ्याच्या समस्या सूरू झाल्या आहेत.
वाढत्या स्क्रीनटाईममुळे अनेकांना कमजोर नजरेची समस्या उद्भवत असून प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला चष्मा वापरावा लागत आहे.
पण असा अक घरगुती उपाय आहे, ज्यामुळे तुमचा वाढलेला चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होईल.
विशेष म्हणजे आपल्या स्वयंपाक घरातील वस्तूंचा वापर तुम्ही यासाठी करू शकता. यासाठी तुम्हाला बदाम घ्यावे लागतील.
याबरोबरच थोडी बडीशेप आणि तितक्याच प्रमाणामध्ये साखर घ्या. आता या सर्व वस्तू मिक्सरमधून बारीक करून घ्या.
आता तयार झालेली ही पावडर रोज रात्री कोमट दुधामध्ये घालून प्या.
नियमितपणे हा उपाय केल्यास डोळ्याचा चष्मा निघून जाण्यासाठी फायदा होईल. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.