Mahesh Gaikwad
आजकाल बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना काही काही आजारांचा सामना करावा लागतो आहे. पण जर तुम्ही एक सवय बदलली तर तुमचे आरोग्य निरोगी राहील.
कामाच्या धावपळीत शारिरीक आरोग्याकडेही लक्ष द्यायला अनेकांना वेळ नसतो. धकाधकीच्या जीवनात दिवसभर उर्जावान कसे राहायचे, याचेच गुपित आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
लहानपणी आपली आई किंवा आजी आपल्याला सकाळी झोपेतून लवकर उठवायची. आपल्या घरातील थोरमोठ्यांकडून सकाळी लवकर उठले पाहिजे, असे अनेकांनी ऐकले असेल.
रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणे हे आरोग्यासाठी फायद्याचे असल्याचे डॉक्टरही आपल्याला सांगतात.
जर तुम्ही दरोरज लवकर उठण्याची सवय लावून घेतली, तर तुम्ही दिवसभर उत्साही आणि उर्जावान राहता.
सकाळी सुर्योदयावेळी किंवा त्यापूर्वी झोपेतून उठले पाहिजे, असे आयुर्वेदातही सांगितले जाते.
सुर्योदयापूर्वी किंवा सुर्योदयावेळी उठल्यानंतर तुम्ही तणाव आणि नैराश्यपासून दूर राहता. दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटत राहते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी लवकर उठल्यामुळे तुम्हाला व्यायामासाठीही वेळ मिळतो. ज्यामुळे तुम्ही लठ्ठपणा कमी करून फिट राहू शकता.
झोपेतून लवकर उठल्यामुळे शरीराचे मेटाबॉलिझम आणि स्लीप सायकल दोन्ही ठीक राहते. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.