Anuradha Vipat
दही हा एक पौष्टिक आणि रुचकर खाद्यपदार्थ आहे, परंतु ते खाताना काही नियम पाळणे आवश्यक आहे.
दही फळ, भाज्यांसोबत खाल्यास ते अधिक चांगले असते.
एका दिवसात जास्त प्रमाणात दही खाल्ल्यास ते पचनासाठी त्रासदायक ठरू शकते.
दही ताक करून खाल्ल्यास ते पचायला अधिक सोपे होते. त्यात मीठ, हिंग किंवा जीरेपूड घातल्यास ते अधिक चवदार आणि पचायला सोपे होते.
अस्थमा असलेल्या लोकांनी दही टाळावे, कारण यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
दही रात्रीच्या वेळी खाल्ल्यास ते पचनास त्रास देऊ शकते. त्यामुळे ते दिवसा किंवा दुपारच्या जेवणात खावे.