sandeep Shirguppe
अंजीर हे फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर गोड आणि रसाळ म्हणून अंजिराची ओळख आहे.
अंजीरमध्ये व्हिटॅमीन ए, सी, ई, के, बी6, पोटॅशिअम, मॅंगनीज आणि मॅग्नेशिअम सारखे पोषकतत्वे आढळून येतात.
हिवाळ्यात जर तुम्ही अंजीर भिजवून खाल्ले तर त्याचे कित्येक फायदे आपल्याला होतात.
भिजवलेल्या अंजीरचे सेवन केल्याने हाडे मजबूत राहण्यास मदत होते.
ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांच्यासाठी भिजवलेले अंजीर खाणे हा रामबाण उपाय ठरू शकतो.
अंजीरमध्ये फायबर्सचे प्रमाण भरपूर आढळून येते. त्यामुळे, आतड्यांची हालचाल होण्यास मदत होते.
अंजीराचे सेवन केल्याने आपल्या त्वचेचे उत्तम पोषण होते आणि त्वचा ग्लोईंग राहते.
अंजीरचे नियमीत सेवन केल्यास रक्तदाबाची समस्या नियंत्रीत होऊ शकते.