sandeep Shirguppe
हिवाळ्यात संतुलित आहाराबरोबरच आवळ्याचे सेवन करणे गरजेचे आहे. आवळ्यामुळे आजारांपासून रक्षण होते.
व्हिटॅमिन-सी, ए, पॉलिफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स हे आरोग्यदायी घटक आवळ्यात असतात.
आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच यापासून साथीचे आजार टाळता येतात.
शिवाय तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारायचे असेल तर आवळा खाणे चांगले समजले जाते.
आवळा सुपरफूड असून त्याचे थंडीत सेवन केल्याने वजन कमी होण्यासही मदत होईल.
आवळा किसून तो भाज्या आणि सॅलेडमध्ये वापरून खावा.
आंबट आवळा खाण्यायोग्य करायचा असेल तर त्यात मीठ, हळद घालून खाता येऊ शकते.
आवळ्याचा रस बाटलीबंद करून त्याच्या ज्यूस पिता येईल. त्यात आवडीप्रमाणे गूळ, पावडर टाकून खाऊ शकता.