sandeep Shirguppe
तुम्हाला स्टॅमिना वाढवायचा असेल तर, तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही आरोग्यदायी बदल घडवू शकता.
यासाठी काही योगासनांची मदत घेऊ शकता. या योगासनांचा नियमित सराव केल्याने शरीरातील स्टॅमिना वाढण्यास मदत होऊ शकते.
शारिरीक अन् मानसिक आरोग्य उत्तम प्रकारे राखण्यासाठी अनेक जण वीरभद्रासन योगासनाचा सराव करतात.
तणाव कमी करण्यासाठी आणि हृदयाची गती नियंत्रित ठेवण्यासाठी वीरभद्रासन योगासन नियमीत करावे.
गोमुखासन हे योगासन मानसिक अन् शारिरीक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.
या योगासनाचा नियमित सराव केल्याने पाठीचा कणा आणि पोटाचे स्नायू ताणण्यास मदत होते.
आपल्या शरीराची पचनक्रिया देखील सुधारते. त्यामुळे, जेवण केल्यानंतर या योगासनाचा सराव केल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात.
ही सामान्य माहिती आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.