sandeep Shirguppe
सणासुदीच्या काळात सोने महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, दरात ३ हजार रुपयांची होणार असल्याचे बोलले जात आहे.
ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने गुंतवणूकदारांना प्रत्येक घसरणीत सोने खरेदीचा सल्ला दिला आहे.
ब्रोकरेजने म्हटले आहे की देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम 76 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
कॉमेक्सवर सोन्याच्या किंमतीला प्रति औंस २४३० डॉलरवर आधार आहे आणि किंमत २६५० प्रति औंस डॉलरपर्यंत जाऊ शकतो.
जागतिक तणाव, आर्थिक अनिश्चितता आणि चलनविषयक धोरण, व्याजदरात कपात आणि जागतिक तणावामुळे सोन्याचे भाव वाढू शकतात.
२०२४ च्या सुरुवातीला, किमतीत वाढ झाल्यामुळे सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला, कारण गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत होते.
जेव्हा जेव्हा जागतिक तणाव असतो तेव्हा परंपरेने सोन्याच्या किमतीत वाढ होते आणि भविष्यातही हीच स्थिती राहते.
चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सेंट्रल बँकेचा सोने खरेदीचा वेग मंदावला आहे आणि तिमाहीत ३९ टक्क्यांनी घटला आहे.