Protein Supplements : शक्तीसाठी सप्लिमेंट्स खाताय तर थांबा, धक्कादायक माहिती उघड

sandeep Shirguppe

प्रोटीन सप्लिमेंट्स

शरीरातील ताकद वाढवण्यासाठी लोक प्रोटीन सप्लिमेंट्स घेतात, परंतु हे धोकादायक असल्याचे बोलले जाते.

Protein Supplements | agrowon

धक्कादायक रिपोर्ट

मेडिसीन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार, प्रोटीन सप्लिमेंटमध्ये अनेक विषारी पदार्थ असतात.

Protein Supplements | agrowon

३६ प्रोटीन सप्लिमेंट्स चाचणी

संशोधनात भारतात उपलब्ध असलेल्या ३६ प्रोटीन सप्लिमेंट्सची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली.

Protein Supplements | agrowon

विषारी द्रव्य

यात विष, कीटकनाशके आणि जड धातू आढळून आले. त्यातही शिसे, आर्सेनिक आणि क्रोमियमसारखे घातक घटक आढळले.

Protein Supplements | agrowon

शेक, पावडर घातकी

या संशोधनानुसार, भारतातील प्रोटीन सप्लिमेंट मार्केटमध्ये त्याच्या गोळ्या, शेक आणि पावडर उपलब्ध आहेत.

Protein Supplements | agrowon

हर्बल उत्पादने घातक

३६ प्रमुख उत्पादनांची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. यामध्ये बहुतांश हर्बल उत्पादनांचा समावेश होता.

Protein Supplements | agrowon

बुरशीजन्य विष

या प्रोटीन शेकमध्ये बुरशीजन्य विष, कीटकनाशके आणि जड धातू असतात ज्यामुळे अनेक रोग होण्याची शक्यता आहे.

Protein Supplements | agrowon

प्रथिने कमी

संशोधनात असे म्हटले आहे की, भारतात विकल्या जाणाऱ्या प्रोटीन सप्लिमेंट्सच्या बहुतांश प्रकारांमध्ये प्रथिने फारच कमी असतात.

Protein Supplements | agrowon

यकृत खराब

संशोधनानुसार यकृताला सर्वात आधी हे नुकसान करतात. यामुळे, ते चयापचय बिघडवते, जास्त सेवनाने कर्करोगही होऊ शकतो.

Protein Supplements | agrowon