sandeep Shirguppe
उन्हाळ्यात नियमितपणे दह्याचे सेवन केल्यास शरीर तर थंड राहतेच पण त्यासोबत आपले आरोग्यही चांगले राहते.
दह्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट, साखर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, झिंक, तांबे, सेलेनियम, आणि व्हिटॅमिन्स आढळतात.
दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात जे केवळ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करत नाहीत तर आरोग्य देखील चांगले ठेवते.
उन्हाळ्यात नियमित दही खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. दह्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते.
उन्हाळ्यात व्यक्ती एक वाटी दह्याचे सेवन तुम्ही करू शकता. व्यक्तीचे वय आणि आरोग्य यावर देखील अवलंबून आहे.
दही तुम्ही गोड लस्सीच्या स्वरुपात सेवन करू शकता, ताक बनवूनही दह्याचे सेवन तुम्ही करु शकता.
तुम्ही तुमच्या आहारात कढी, दही पापडी किंवा दही वडा या स्वरूपातही दह्याचे सेवन करु शकता.
बटाटा रायता, बुंदी रायता, काकडी रायता, लौकीचा रायता इत्यादी रूपातही तुम्ही दही खाऊ शकता.