Anuradha Vipat
योगासने करणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असले, तरी ते चुकीच्या पद्धतीने केल्यास स्नायूंवर ताण येणे, सांधेदुखी किंवा गंभीर दुखापत होऊ शकते.
अनेकदा लोक उत्साहाच्या भरात किंवा अपुऱ्या माहितीमुळे योगा करताना काही सामान्य चुका करतात.
योगासने नेहमी रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर किमान ३ ते ४ तासांनी करावीत.
योगामध्ये श्वासोच्छवासाला खूप महत्त्व आहे. आसन करताना श्वास नैसर्गिक आणि संथ गतीने चालू ठेवावा.
पहिल्याच दिवशी पूर्ण लवचिकता येणे अशक्य आहे. शरीराची क्षमता ओळखून हळूहळू सराव वाढवावा.
योगा सुरू करण्यापूर्वी शरीर थोडे मोकळे करणे गरजेचे आहे. योगा संपल्यानंतर शरीराला शांत करण्यासाठी ५ मिनिटे 'शवासन' करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सोशल मीडियावरील व्हिडिओ किंवा वर्गातील दुसऱ्या व्यक्तीला पाहून तशाच पद्धतीचे कठीण आसन करण्याचा प्रयत्न करू नका.