Anuradha Vipat
व्यायामाची सुरुवात करताना योग्य पद्धत, सातत्य आणि शरीराची क्षमता समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.
चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यास दुखापत होण्याचा धोका असतो. त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदाच किंवा बऱ्याच दिवसांनंतर व्यायाम सुरू करत असाल तर खालील गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा.
व्यायामाची थेट सुरुवात न करता आधी ५ ते १० मिनिटे हलका वॉर्म-अप करा. यामुळे स्नायू मोकळे होतात आणि दुखापतीचा धोका टळतो.
पहिल्याच दिवशी खूप जड व्यायाम किंवा तासनतास वर्कआऊट करू नका. सुरुवातीला १५ ते २० मिनिटांपासून सुरुवात करा.
व्यायामानंतर स्नायूंमध्ये हलका ताण येणे सामान्य आहे. मात्र, जर सांध्यांमध्ये किंवा छातीत तीव्र वेदना होत असतील, तर व्यायाम त्वरित थांबवा.
तुम्ही किती वजन उचलत आहात किंवा किती वेगाने व्यायाम करत आहात यापेक्षा, तो योग्य पद्धतीने करत आहात की नाही हे महत्त्वाचे आहे.
व्यायाम करताना शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. वर्कआऊटच्या आधी आणि नंतर थोडे थोडे पाणी प्या.