Yoga For Belly Fat : पोटाचा वाढलेला घेर कमी करण्यासाठी कोणता योगा करावा?

Anuradha Vipat

योगासने

पोटाचा वाढलेला घेर आणि चरबी कमी करण्यासाठी योगासने अत्यंत प्रभावी आहेत.

Yoga For Belly Fat | agrowon

 नौकासन

हे आसन पोटाच्या चरबीवर थेट परिणाम करते.  जमिनीवर झोपून पाय आणि शरीराचा वरचा भाग ३० ते ४५ अंशात वर उचलावा.शरीराचा भार नितंबावर असावा.

Yoga For Belly Fat | Agrowon

भुजंगासन

पोटावर झोपून हातांच्या तळव्यावर जोर देऊन शरीराचा पुढचा भाग वर उचलावा आणि आकाशाकडे पहावे.

Yoga For Belly Fat | Agrowon

कुंभकासन

पुश-अप्सच्या स्थितीत येऊन संपूर्ण शरीराचा भार हातांचे पंजे आणि पायांच्या चवड्यावर संतुलित ठेवावा. शरीर एका सरळ रेषेत असावे.

Yoga For Belly Fat | Agrowon

धनुरासन

पोटावर झोपून पाय गुडघ्यात वाकवावे आणि हातांनी पायाचे घोटे धरून शरीर वर उचलावे. शरीराचा आकार धनुष्यासारखा करावा.

Yoga For Belly Fat | agrowon

कपालभाती प्राणायाम

हे आसन नसले तरी पोटाचा घेर कमी करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली प्राणायाम आहे.

Yoga For Belly Fat | Agrowon

नियमितता

ही आसने दररोज सकाळी रिकाम्या पोटी केल्यास लवकर रिझल्ट मिळतो.

Yoga For Belly Fat | agrowon

C-Section Stitches : सिझेरियनमध्ये किती टाके पडतात?

C-Section Stitches | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...